ऐतिहासिक : 100 टक्के SAF वापरून व्हर्जिन अटलांटिक लंडन ते न्यूयॉर्क उड्डाण करणार

लंडन : अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या मालकीचे व्हर्जिन अटलांटिक 100 टक्के शाश्वत विमान इंधन (SAF) वापरून या महिन्यात 28 नोव्हेंबर रोजी लंडन ते न्यूयॉर्कपर्यंत उड्डाण करून इतिहास रचणार आहे. व्हर्जिन अटलांटिकला ब्रिटन सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.ब्रिटनच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने सोमवारी व्हर्जिन अटलांटिकला SAF द्वारे चालवल्या जाणार्‍या ट्रान्सअटलांटिक उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली.

या उड्डाणाच्या माध्यमातून सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) ची अत्यावश्यकता अधोरेखित होणार आहे. सध्या SAF मर्यादित प्रमाणात उत्पादित केले जाते आणि त्याची किंमत पारंपारिक जेट इंधनापेक्षा जास्त आहे. व्हर्जिन अटलांटिकचे CEO शाई वेइस, म्हणाले कि, आम्ही 2030 पर्यंत 10% SAF वापरण्यासाठी वचनबद्ध आहोत, परंतु तेथे पोहोचण्यासाठी आम्हाला SAF उद्योग उभारण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here