विश्वराज शुगर करणार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक

मुंबई : विश्वराज शुगर इंडस्ट्रीजने (वीएसआयएल) ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. ग्रीनफील्ड शुगर फॅक्टरी स्थापन करणे आणि कर्नाटकातील बेळगावमधील आपल्या सध्याच्या डिस्टिलरीचा विस्तार करण्याची ही योजना आहे. कंपनी खास करुन इथेनॉल उत्पादनासाठी प्रती दिन १०० किलो लीटर क्षमतेच्या डिस्टिलरीसह २५० कोटी रुपये खर्च करून ग्रीनफील्ड साखर प्लांट सुरू करेल. यासोबतच कंपनी सध्याच्या डिस्टिलरीची क्षमता १५० केएलपीडी पर्यंत वाढविण्यासाठी आणखी १५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

Thehindubusinessline.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, व्हीएसआयएलचे कार्यकारी संचालक मुकेश कुमार यांनी सांगितले की, या योजनेसाठी इक्विटी आणि कर्ज रुपात निधी उभारणी केली जाईल. कंपनीकडून रेक्टिफाईड स्पिरीट, मोलॅसिस, शुगर सिपरपासून अनहायड्रस इथेनॉलचे उत्पादन केले जाते.

कुमार यांनी सांगितले की, कंपनीने साखरेवरील आपले अवलंबित्व कमी केले आहे. मार्चमध्ये समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात साखर विक्रीतून येणारा महसूल ६६ टक्के इतका होता. सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर इथेनॉलमधून मिळणारे उत्पन्न ३०-३५ टक्क्यांवरुन वाढून ५० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे असे कुमार म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here