ब्राझीलच्या साखर उद्योग तज्ञाची सह्याद्री साखर कारखान्यास भेट

सातारा : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला ब्राझीलमधील साखर उद्योग तज्ञ मार्सिओ यांच्यासह राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे मुख्य सल्लागार डॉ. आर. बी. डौले यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांची संचालक मंडळाबरोबर बैठक झाली. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघातर्फे दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मार्सिओ म्हणाले, शेतात ऊस तोडणी झाल्यानंतर थेट कारखान्यात गाळप केला जातो. ब्राझीलने विकसित केलेल्या तंत्रज्ञानानुसार उसाबरोबर येणारी माती व पाला स्वच्छ केल्यास प्रतिटन अर्धा टक्का उतारा वाढतो. त्यासाठी खर्चही जास्त येत नाही. जुन्या तंत्रज्ञानाने माती व पाला रसातून काढण्याची पद्धत खर्चिक आहे. यावेळी कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे, कांतिलाल पाटील, लालासाहेब पाटील, माणिकराव पाटील, अविनाश माने, डी. बी. जाधव, पांडुरंग चव्हाण, संजय थोरात, रामदास पवार, वसंतराव कणसे, सर्जेराव खंडाईत, रामचंद्र पाटील, संजय कुंभार, संचालिका शारदा पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here