विठ्ठल कॉर्पोरेशनचा 24 ऑक्टोबरला बॉयलर अग्नि प्रदिपन शुभारंभ : यशवंत शिंदे

सोलापूर : म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन लि. साखर कारखान्याचा १६ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन शुभारंभ विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संस्थापक – चेअरमन, आमदार बबनराव शिंदे यांच्या शुभ हस्ते 24 ऑक्टोबर 2023 ला होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत संजयमामा शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प.पू. शिवचरणानंद सरस्वती महाराज (महादेव टेकडी, चिंचगाव, ता. माढा) तर विठ्ठल कॉर्पोरेशनचे संस्थापक-चेअरमन, आमदार संजयमामा विठ्ठलराव शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला मंगळवार दि. 24/10/2023 रोजी सकाळी 10.05 वाजता संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकारी सल्लागार व्ही. आर. गिलडा, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. रणवरे आणि संचालक मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here