विठ्ठल कॉर्पोरेशनचा पहिला २७०० रुपये हप्ता जमा : संस्थापक-चेअरमन, आमदार संजयमामा शिंदे

सोलापूर : विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगांव साखर कारखान्याचा चालू गाळप हंगामासाठी गाळपास आलेल्या ऊस बिलापोटी २७०० रुपये प्रती मे.टन प्रमाणे पहिला हप्ता सर्व शेतकरी, ऊस उत्पादक सभासद व बिगरसभासद यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक-चेअरमन, आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. तसेच मागील हंगाम २०२२-२३ मध्ये झालेल्या ऊस गळीतास प्रती मे.टन १०० रुपये प्रमाणे दुसरा हप्ता ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. कारखान्याचा १६ वा गाळप हंगाम सुरु झाला आहे.

कारखान्यास ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेबरोबरच ऊस पुरवठाही पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होत आहे. सर्व तोडणी वाहतूक कंत्राटदार व ऊस उत्पादक शेतकरी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करुन चालू गाळप हंगाम व्यवस्थित सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कार्यकारी संचालक यशवंत शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. रणवरे, कार्यकारी सल्लागार विजयकुमार गिलडा, असि. जनरल मॅनेजर वैभव काशिद, चिफ इंजिनिअर मोहन पाटील, चिफ केमिस्ट प्रदीप केदार, डिस्टीलरी मॅनेजर अनिल शेळके, मुख्य वित्तीय अधिकारी भास्कर गव्हाणे, मुख्य शेती अधिकारी महेश चंदनकर, पर्चेस अधिकारी कल्याण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार पाटील, एच. आर. मॅनेजर परमेश्वर माळी, सुरक्षा अधिकारी सचिन शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here