सोलापूर जिल्ह्यात विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात अग्रेसर : आमदार बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे पिंपळनेर व करकंब युनिटच्या वतीने गतीने गाळप सुरू आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस पुरवठादारांनी कारखान्याकडे नोंदवलेल्या उसाचे गाळप मार्चअखेरपर्यंत करण्यासाठी कारखान्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कारखान्याने ११ ते २० फेब्रुवारीअखेर गाळप झालेल्या उसाचे अनुदानासह प्रती टन २८०० रुपयांप्रमाणे एकूण ४७ कोटी ६७ लाख ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आ. बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली.

आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले की, कारखान्याच्या पिंपळनेर युनिटने आजअखेर १४ लाख ३० हजार ६८१ मे. टन तर करकंब युनिटने ४ लाख ९७ हजार ६४० मे. टन असे एकूण १९ लाख २८ हजार ३२१ मे. टन ऊसाचे गाळप केलेले आहे. हंगामात सभासद, ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊसाचे गाळप होणे आवश्यक आहे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पिंपळनेर युनिटने २० लाख मे.टन व करकंब युनिटने ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here