विठ्ठलराव शिंदे कारखान्यास व्हीएसआयचा राज्यस्तरीय पुरस्कार : संस्थापक-अध्यक्ष, आ. बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) मध्य विभागातील तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता आणि प्रथम क्रमाकांचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याचे सभासद विजय लोकरे (रा. उजनी) व सुरेश आवारे (रा. पिंपळनेर) यांना मध्य विभागातील प्रथम क्रमाकांचा ऊसभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली.

साखर कारखान्याने गळीत हंगामामध्ये युनिट एक पिंपळनेरमध्ये १८ लाख ४१ हजार ४२० मे. टन ऊसाचा गाळप करुन १६ लाख ५२ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा साखर उतारा ११.३३ टक्के आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने अल्पावधीत देशात, राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे, असे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांनी सांगितले. कारखान्याचे सभासद विजय लोकरे यांनी मध्य विभागात पूर्व हंगामात कोएम ०२६५ या उसाचे हेक्टरी ३१४.५८ इतके ऊस उत्पादन घेतले आहे. त्यांची ऊसभूषण पुरस्कारासाठी प्रथम क्रमाकांने निवड झाली आहे. सुरेश आवारे यांनी खोडवा हंगामात कोएम ०२६५ या उसाचे हेक्टरी २३९.५२ टन इतके ऊस उत्पादन घेतले आहे. त्यांची ऊसभूषण पुरस्कारासाठी प्रथम क्रमाकांने निवड झाली आहे असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here