विठ्ठलराव शिंदे कारखाना पहिला हप्ता २,७०० रुपये देणार : संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे पिंपळनेर व करकंब या कारखान्यांचा २४ वा गाळप हंगाम नुकताच सुरू झाला आहे. या हंगामात उसाला पहिला ॲडव्हान्स हप्ता प्रती टन २,७०० रुपयांप्रमाणे देणार येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांनी दिली. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रजे, युनिट नं.२ चे जनरल मॅनेजर एस. आर. यादव व खातेप्रमुख उपस्थित होते.

आ. बबनराव शिंदे म्हणाले की, दरवर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे सर्व वजनकाटे वैधमापन विभागाकडून तपासणी करण्यात येतात. यापूर्वी अनेक वेळा भरारी पथकाने कारखान्याचे दोन्ही युनिटच्या वजनकाट्यांची तपासणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत केली आहे. भरारी पथकाने सर्वांसमक्ष पंचनामे केले आहेत. वजन काट्यांमध्ये तफावत आढळून आलेली नाही. त्यामुळे विनाकारण कारखान्याच्या वजन काट्यासंदर्भात अफवा पसरवू नयेत.

आमदार शिंदे म्हणाले की, कारखान्याकडून दीपावली सणासाठी १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान गळीतास आलेल्या ऊसाचे प्रती टन २७०० रुपयांप्रमाणे बील ऊस पुरवठादारांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. कारखान्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीसाठी १६.६६ टक्के बोनस देण्यात आला आहे. ऊस तोडणी मजूरांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here