विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना बेणे बदल व बेणेवाटप योजना राबविणार : आ. अध्यक्ष, आमदार बबनदादा शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे नव्या हंगामात बेणे बदल व वाटप योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने गळीत हंगामासाठीचे ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. या नवीन धोरणामुळे उसाची प्रतवारी वाढून साखरेची जादा गुणवत्ता दिसून येणार असून ऊस वजनातही वाढ दिसून येणार आहे. कारखान्याच्या पिंपळनेर व करकंब या दोन्ही युनिटच्या सभासद, बिगर सभासद ऊस पुरवठादार शेतकऱ्यांसाठी हे ऊस लागवड धोरण आहे. यामध्ये बेणे बदल निर्णय, सूक्ष्म अन्नद्रव्य वाटप योजना, कंपोस्ट खत वाटप योजना, माती क्षण योजना या योजनांचा समावेश आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली.

अध्यक्ष तथा आमदार शिंदे म्हणाले की, कारखान्यामार्फत माती व पाणी स्रोतातील माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळेत करून नत्र स्फुरद पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच पाण्याची घनता (पी.एच.) तपासून देऊन खत व पाणी देणे याचे मार्गदर्शन केले जात आहे. ऊस लागवड धोरण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे व जनरल मॅनेजर सुहास यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी नारायण लगड व शेती खात्यातील अॅग्री ओव्हरसीयर, कर्मचारी प्रयत्नशील आहेत. ऊस लागवडीच्या आडसाली, पूर्व हंगामी व सुरू अशा तीन हंगामाठी कोसी ६७१, को-८६०३२, व्हीएसआय ८००५, एम एस १०००१, कोएम ०२६५, को ९०५७, पीडीएन १५०१२, केव्हीएसआय १८१२१ व फुले १३००७ या जातीच्या बेण्यांची हंगाम निहाय लागण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here