ऊस संशोधनासाठी VNMAUचा आयआयएसआरशी सामंजस्य करार

औरंगाबाद : परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (VNMAU) अलिकडेच ऊस विषयातील संयुक्त संशोधनासाठी लखनौच्या भारतीय ऊस संशोधन संस्थेसोबत (IISR) एका सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे. विद्यापीठाचे कुलपती इंद्र मणी यांनी सांगितले की, हा सामंजस्य करार ऊसाच्या दीर्घकालीन संशोधन कार्यक्रमांचा मार्ग प्रशस्त करेल. सामंजस्य करारामध्ये खास करून नॅनो टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्रिडिंग, बायोटेक्नोलॉजी, पिकाचे उत्पादन आणि सुरक्षेचे तंत्रज्ञान आदी क्षेत्रांचा समावेश आहे.  शियपेये आणि गुळावर आधारित उत्पादनांच्या रुपात ऊसाच्या मूल्य संवर्धनासाठीही याचा फायदा होईल.

एमओयूचा एक भाग म्हणून, आयआयएसआरकडून वेळोवेळी संशोधक, ऊस उत्पादक शेतकरी, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मणी यांनी सांगितले की, केंद्रीय संस्थेशी संलग्न झाल्याने विद्यार्थ्यांना खूप मदत मिळेल. ते म्हणाले की, प्लांट  पॅथॉलॉजी, प्लांट मायक्रोबायोलॉजी, प्लांट बायोटेक्नोलॉजी, अॅग्रोनॉमी, मृदा विज्ञान आणि कृषी रसायन विज्ञानाशी संबंधित विद्यापीठातील पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवीधारक विद्यार्थ्यांना संशोधनात एमओयूमुळे मदत मिळेल. सामंजस्य करारावर विद्यापीठाचे अधिकारी आणि  ए. डी. पाठक, आयआयएसआरचे संचालक ए. के. सिंह यांच्यासह इतरांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here