बिद्री साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी मतदान

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी, 3 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत शुक्रवारी (1 डिसेंबर) सायंकाळी समाप्त होत आहे. त्यामुळे प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. निवडणुकीत काटाजोड लढती पाहायला मिळणार आहेत. सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी आणि विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी, सहा अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी सायंकाळी थंडावणार आहे. निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांनी रान उठवले आहे. अनेकांनी आकडेमोड करत आपले अंदाज दिले आहेत. त्याचबरोबर कोणी सत्तारूढकडून, तर कोणी विरोधी आघाडीकडून पैजा लावल्या आहेत. बिद्री कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यांतील 218 गावांत विस्तारलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here