बिद्री साखर कारखान्यासाठी 3 डिसेंबर रोजी मतदान

कोल्हापूर : श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (बिद्री) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. ३ डिसेंबर) २५ जागांसाठी मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत आहे. मतदान प्रक्रियेसाठी राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर या चार तालुक्यांतील कार्यक्षेत्रात १७३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी सुमारे १५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर या चार तालुक्यांतील कार्यक्षेत्रात १७३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे.
मतदान सुरक्षेसाठी २१५ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १७३ मतदान केंद्रासाठी १६ झोन तयार करण्यात आले असून, त्यासाठी १६ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेच्या सोयीसाठी २४ एस.टी. बस व इतर ५० हून अधिक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी मंगळवारी (दि. ५ डिसेंबर) सकाळी ८ पासून सुरु होणार आहे. ही मतमोजणी सुवर्णभूमी हॉल, मुस्कान लॉन, कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीसाठी ५५० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण काकडे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून युसूफ शेख काम पाहात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here