व्हीएसआय चे पुरस्कार जाधव, साळुंखे, खोत या उस उत्पादकांना जाहीर

पुणे :
उस उत्पादकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विविध संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच अग्रेसर असणार्‍या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने 2019-20 हंगामातील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकरी प्रकाश विलास जाधव यांनी पूर्वहंगामी गटात, सांगली जिल्ह्यातील कै. सुरेश कृष्णा साळुंखे यांनी सुरु गटात, तर सांगली जिल्ह्यातील अशोक हिंदुराव खोत यांनी खोडवा गटात प्रथम क्रमांक मिळवत उसभूषण पुरस्कार मिळवला आहे. तर राज्यातील सर्वोत्कृष्ट आसवानी पुरस्कार यंदा नगरच्या अंबालिका शुगरने पटकावला आहे.

व्हीएसआय ची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी सकाळी मांजरी येथे होणार आहे. यावेळी व्हीएसआय चे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची उपस्थिती असणार आहे. सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत.

या पुरस्कार वितरणाची तारीख नंतर जाहीर होणार आहे. याबाबत बोलताना व्हीएसआय चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले की, कोरोनामुळे ही सभा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. या सभेतच हे पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. पुरस्कार प्रदान सोहळयाची तारीख नंतर ठरवली जाणार आहे.

पुरस्कार प्राप्त कोल्हापूर जिल्ह्यातील औरवाडचे शेतकरी प्रकाश जाधव यांनी पूर्वहंगामी गटात को 86032 वाणाचे हेक्टरी 399.08 टन इतके उत्पादन घेतले आहे. त्यांना दहा हजारांचा कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे.

तर सांगलीच्या खानापूर भागातील पारे गावचे प्रयोगशील शेतकरी कै. सुरेश साळुंखे यांना कै. वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर झ्राला आहे. पाच महिन्यांपूर्वी कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. त्यांनी 86032 वाणाचे 336.30 टन उत्पादन घेतले.

सांगलीच्याच वाळवा भागातील शेतकरी अशोक खोत यांना दहा हजाराचा कै. आण्णासाहेब शिंदे पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी इस्लामपूरमध्ये 86032 वाणाचे खोडव्यात हेक्टरी 308.25 टन इतके उत्पादन केले आहे.

याबराबेरच सर्वात्कृष्ट आसवनीसाठी दिला जाणारा एक लाखाचा कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार कर्जतच्या अंबीकानगर येथील अंबालिका साखर कारखान्याने मिळवला आहे. कै. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे., पाटील यांच्या नावाने एक लाख रुपये व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार क्रांतिकग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला जाहीर जाला आहे. तर कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोतकृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार आलेगाव येथील दौंड साखर कारखान्याला मिळाला आहे.

उत्तम कामगिरी करणार्‍या कारखान्यांमध्ये यंदा दक्षिण विभागातून बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा कारखान्याला प्रथम, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने द्वितीय तर रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याने तृतीय पुरस्कार मिळवला आहे. शिवाय कष्टाळू कर्मचार्‍यांमध्ये जालना जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे सर्जेराव वालटे यांना यंदाचा उत्कृष्ट उस विकास अधिकारीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

इतर पुरस्कार मिळालेल्यांची यादी
उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी : सागर पाटील
उत्कृष्ट चीफ इंजिनियर : विजय खालकर
उत्कृष्ट चीफ केमिस्ट : शशिकांत गिरमकर
उत्कृष्ट आसवानी व्यवस्थापक : सय्यद इस्माइल शेख
उत्कृष्ट कार्यकारी संचालक : यशवंत कुलकर्णी
व्हीएसआय उत्कृष्ट कर्मचारी : शास्त्रज्ञ डॉ. प्रीती देशमुख, सचिन साबळे, विश्‍वास घुले, शिवाजी खेंगरे, रुपेश धुमाळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here