वसंतदादा साखर कारखान्याचे हँड सॅनिटाइझर बाजारात

कोल्हापूर, ता. 29 : कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणाऱ्या सॅनिटायझर निर्मितीसाठी सांगलीच्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला परवानगी मिळाली आहे. या कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची पहिली बॅच तयार केली आहे. तसेच, 99 टक्के प्युअरिटीचे अल्कोहोल असलेले जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशा नुसार तयार झालेले महाराष्ट्रातील पहिले हॅन्ड सॅनिटायझर आहे. सध्या ते ‘आय एम टीम विशाल’ नावाने ते बाजारात विक्रीसाठी ठेवले जात आहे.
कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या साखर कारखान्याना सॅनिटाइझर बनवणे शक्य आहे, आशा कारखान्यांनी तात्काळ हँड सॅनिटाइझर ननिर्मितीच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी तातडीने सॅनिटायझर निर्माण करण्याबाबत निर्णय घेतला.

वसंतदादा कारखान्याच्या डिस्टिलरीमध्ये गुरुवारपासून सॅनिटायझर निर्मितीस प्रारंभ झाला. अर्धा लीटर ते पाच लीटर बाटलीमध्ये सॅनिटायझर बनवले जात आहे. आज पहिली बॅच बाहेर पडली.  ‘आय एम टीम विशाल’ या नावाने ब्रॅन्ड बनला असुन ‘जॉईन टीम विशाल’ असे आवाहन बाटलीवरील स्टीकरवरुन केले आहे.
सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये तसेच नागरिकांना मोफत वितरण करण्यासाठी प्रतिष्ठानने यंत्रणा उभारली आहे. वसंतदादा कारखान्यामार्फत उत्पादन घेतले जाणार आहे. दररोज पाचशे बाटल्या उत्पादीत केल्यानंतर त्याचे जिल्हाभर वितरण केले जाणार आहे.
कोरोनाचे संकट थोपवण्यासाठी सॅनिटाइझर हे महत्वाचे लिक्विड आहे. त्याचा प्रसार रोखन्यासाठी नफ्याचा विचार न करता सॅनिटायझर बनवले जात आहे. तसेच हे सॅनिटायझर सामाजिक कर्तव्य म्हणून लोकांना मोफत वाटप केले जाणार आहे.”
– विशाल पाटील (अध्यक्ष, वसंतदादा कारखाना)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here