‘VSI’ विदर्भातील शेतकऱ्यांना ऊस पिक उत्पादनास करणार मदत

नागपूर : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय/Vasantdada Sugar Institute) विदर्भातील शेतकऱ्यांना ऊस पिक उत्पादनास मदत करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, ऊस पिकाला प्रोत्साहन देवून विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. नागपूरमधील पाटकर क्लबमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पवार यांनी आपल्या दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यात शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या घरी भेट घेतली.

मंत्री गडकरी यांनी व्हीएसआय’चे उपकेंद्र विदर्भात आणण्यावर जोर दिला. त्यांनी १०० एकर जमिनीची पाहणी केली. या जमिनीवर उपकेंद्र विकसित केले जाऊ शकते. पवार यांनी सांगितले की, जर शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिके घेतली तर त्यांना संकटापासून दूर ठेवता येईल. दीर्घ काळापासून विदर्भातील शेतकरी कापूस आणि सोयाबीन शेती करीत आहेत. त्यापासून समाधानकारक उत्तर मिळत नाही. पवार यांनी सांगितले की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या भागातील शेतकऱ्यांना ऊस शेती कशी करावी आणि यापासून उप उत्पादने कशी मिळवावीत यासाठी प्रशिक्षण देईल. मला असे वाटते की, यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील. ऊसापासून आम्हाला साखरेसोबत इथेनॉल उत्पादनही करू शकतो. पवार यांनी स्पष्ट केले की, जर मराठवाडा, खानदेशातील शेतकरी ऊस पिक घेऊ शकतात, तर विदर्भातील शेतकरी का चांगले उत्पादन मिळवू शकणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here