उत्तर प्रदेशमधील कारखान्यांनी थकबाकी भागवली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा

बिजनौर (उत्तरप्रदेश): इथल्या साखर कारखान्यांनी ऊस शेतकर्‍यांना अजूनही उसाचे पैसे दिलेले नाहीत. या विरोधात बिजनौर च्या 21 पोलिस ठाण्या बाहेर धरणे आंदोलन करणार्‍या ऊस शेतकर्‍यांनी मंगळवारी आपले आंदोलन मागे घेतले.

जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांवर परिसरातील जवळपास 75,000 ऊस शेतकर्‍यांचे 725 करोड रुपये देय बाकी आहे. प्रशासनाने शेतकर्‍यांना लवकरच 65 करोड रुपये भागवण्याचे आश्‍वासन दिले, ज्यानंतर शेतकर्‍यांनी सध्या तरी आपले धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय किसान यूनियनशी संलग्न असणारे यूथ विंग च्या पदाधिक़ार्‍यांनी आंदोलन संपवण्याची माहिती दिली. ते म्हणाले, परिसरातील ऊस शेतकर्‍यांचे एकूण 725 करोड रुपये जिल्ह्यातील कारखान्यांकडून देय आहेत. यामध्ये बिजनौर, चांदपुर, बिलई आणि बरकतपूर च्या कारखान्यांनी शेतकर्‍यांना काहीच दिलेले नाही. 21 पोलिस ठाण्यांवर शेतकर्‍यांनी धरणे आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने अश्‍वासन दिले की, डिफाल्टर साखर कारखान्यांकडून काहीच दिवसात 65 करोड रुपयांची देणी भागवली जातील. त्यांनी सोंगितले की, कारखान्यांनी मंगळवारी 32 करोड रुपयांची देणी भागवली आहेत, 33 करोड रुपयांची देंणी पुढच्या 15 दिवसाच्या आत भागवली जातील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here