मुंबईत पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

41

भारतीय हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील मुंबई, पालघर, ठाण्यासह किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ॲलर्ट जारी केला आहे. बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या खाडीत दोन चक्रीय वादळे स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. त्यामुळे एका दिशेने पूर्व-मध्य भारत आणि दुसरीकडे उत्तर-पश्चिम भारतात पावसाची शक्यता आहे. पुढील दहा दिवस उत्तर भारतात पाऊस कमी होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतातून मान्सून माघारी जाण्यास उशीरही होऊ शकतो. गेल्यावर्षीही अशाच प्रकारे मान्सून परतण्यास उशीर झाला होता.

हवामान विभागाने मंगळवारपर्यंत उत्तराखंडची राजधानी डेहराडूनसह नैनिताल, अल्मोडा, पौडी आणि पिथौरागड अशा पाच जिल्ह्यात जोरदार पावसाचा अॅलर्ट दिला आहे. डोंगराळ भाग असल्याने विशेष सतर्कता बाळगण्याचा इशारा दिलाआहे. त्यामुळे पौंडीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत.

दरम्यान दिल्लीमध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर २१ व २२ सप्टेंबर रोजी पावसाला पुन्हा सुरुवात होऊ शकते. कालपासून वातावरणात बदल दिसू लागला आहे. आयएमडीने पश्चिम बंगाल, झारखंड, दक्षिण राजस्थान, तेलंगणा, सिक्कीम, पूर्वोत्तर भारत, बिहार, हिमाचल प्रदेश, कोकण, गोवा, अंदमान आणि निकोबार, आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता वर्तविली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here