लवकर ऊस बिले न दिल्यास धरणे आंदोलनाचा इशारा

बागपत : किनौनी साखर कारखान्याविरोधात मांगरौली गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली. जर कारखान्याने लवकरात लवकर ऊस बिले अदा केली नाहीत, तर शेतकरी कारखान्याच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू करतील असा इशारा देण्यात आला.

मांगरौली गावचे माजी सरपंच इम्रान त्यागी यांच्या घरी झालेल्या ऊस उत्पादकांच्या बैठकीत किनौनी साखर कारखान्याने उसाचे पैसे न दिल्याचा मुद्दा शेतकऱ्यांनी मांडला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पैसे न मिळाल्यास आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. बैठकीला नवाब अली, अबरार, बब्बन, बशीर, पप्पू, शौकत, गफ्फार, मुंतयाज, सलीम, आस मोहम्मद, झाकिर, इम्रान आदी उपस्थित होते.

दरम्यान, यासंदर्भात किनौनी साखर कारखान्याचे सर व्यवस्थापक राजकुमार टाया यांनी सांगितले की, कारखान्याने नोव्हेंबर महिन्यामधील ऊस बिले समितीकडे पाठवली आहेत. आता लवकरच सात डिसेंबरपर्यंतची बिले समितीकडे पाठविण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here