ऊस बिले न मिळल्यास कारखान्यासमोर धरणे आंदोलनाचा इशारा

रुडकी : ताशीपूर येथील कॅन्सर पीडिताच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचलेल्या शेतकरी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षांनी साखर कारखान्याकडून लवकारत लवकर त्यांचे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या वेळी त्यांनी आपल्याकडून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

ताशीपूर येथील एका शेतकरी कुटुंबाने आपल्या घरावर घर विक्रीचा फलक लावला आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कॅन्सर आहे. त्यावर उपचार सुरू असून या उपचारासाठी पैसे नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. संबंधितांचे इकबालपूर साखर कारखान्याकडे गेल्या दोन वर्षांपासून आठ लाख रुपये थकीत आहेत. रविवारी किसान काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुशील राठी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांची घरी जावून भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शेतकरी कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिलले. इकबालपूर साखर कारखान्याकडील थकबाकीबाबत कारखान्याच्या व्यवस्थापकांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. जर पैसे दिले नाहीत, तर काँग्रेसचे कार्यकर्ते कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू करतील असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष सेठपाल परमार, सतेंद्र त्यागी, सुमित, सुधीर त्यागी, मेलाराम प्रजापती, मामचंद त्यागी, मुकेश, रजत त्यागी, आनंद त्यागी आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here