महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारीही राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणासह काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पावसाचा हा कालावधी सतत वाढत राहणार आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईचे आज कमाल तापमान ३२ आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रणीत आहे. पुण्यात कमाल तापमान २९ तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण राहील आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आज नागपुरात कमाल तापमान ३४ तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि काही काळ मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. हवेची गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here