जलसंकट: देशातील प्रमुख 150 जलाशयांमध्ये केवळ 38 टक्के पाणीसाठा

नवी दिल्ली : भारतातील 150 प्रमुख जलाशयांची साठवण क्षमता सध्या त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ 38 टक्के असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. हा आकडा गेल्या दशकातील याच कालावधीतील सरासरीपेक्षा कमी आहे. बेंगळुरूची मागणी 2,600 एमएलडी आहे, मात्र शहराला सुमारे 500 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

केंद्रीय जल आयोगाच्या साप्ताहिक अहवालानुसार, कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कमी जलसाठ्याची नोंद झाली आहे. बेंगळुरूमध्ये 14,000 पैकी 6,900 बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. शहरातील जलस्रोतांवर अतिक्रमण झाले आहे किंवा ते कोरडे पडले आहेत. शहराची पाण्याची गरज 2,600 एमएलडी आहे, ज्यापैकी 1,470 एमएलडी कावेरी नदीतून आणि 650 एमएलडी बोअरवेलमधून मिळते, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, त्रिपुरा, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा (दोन्ही राज्यांमधील दोन संयुक्त प्रकल्प) आणि तामिळनाडू या राज्यांसह इतर राज्यांमध्येही पूर्वीच्या तुलनेत कमी साठवण पातळी नोंदवली गेली. अधिकृत आकडेवारीनुसार, या 150 जलाशयांची एकूण साठवण क्षमता 178.784 अब्ज घनमीटर (बीसीएम) आहे, जी देशाच्या अंदाजे 257.812 बीसीएम साठवण क्षमतेच्या 69.35 टक्के आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here