देशाच्या दक्षिण विभागातील जलाशयांतील पाणीसाठा १७ टक्क्यांवर : CWC

नवी दिल्ली : देशभरातील जलाशयांमध्ये उपलब्ध पाणीसाठा १८ एप्रिल २०२४ अखेर ५६.०८५ बीसीएमवर आला आहे. या जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या तुलनेत हे प्रमाण ३१ टक्के आहे, असे केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) ताज्या अहवालात म्हटले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत जलाशयांमध्ये उपलब्ध पाणीसाठा ६७.५७५ बीसीएम होता. तर १५० जलाशयांमध्ये उपलब्ध पाणीसाठा मागील वर्षीच्या याच कालावधीतील पाणीसाठ्याच्या ८३ टक्के इतका आहे.

चालू वर्षातील जलसाठा मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत कमी आहे. उत्तर प्रदेशातील १० जलाशयांमध्ये उपलब्ध पाणीसाठा ६.३९६ बीसीएम आहे. हा पाणीसाठा जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या ३२.५ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत साठा ३८ टक्के होता.

पूर्व विभागात, २३ जलाशयांमध्ये उपलब्ध पाणीसाठा ८.२९२ बीसीएम आहे, जो या जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या ४०.६ टक्के आहे. मागीलवर्षी याच कालावधीत जलसाठा ३५ टक्के होता. पश्चिम विभागात, ४९ जलाशयांमध्ये उपलब्ध पाणी १२.५८४ बीसीएम आहे, जे या जलाशयांच्या एकूण साठवण क्षमतेच्या ३३.० टक्के आहे.

मध्य प्रदेशात, २६ जलाशयांमध्ये उपलब्ध पाणी १९.४९७ बीसीएम आहे. हा साठा एकूम क्षमतेच्या ४० टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत जलसाठा ४४ टक्के होता. तर दक्षिण विभागातील, ४२ जलाशयांमध्ये उपलब्ध पाणी ९.३१६ बीसीएम आहे. एकूण साठवण क्षमतेच्या हा साठा १७ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३० टक्के साठा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here