हरियाणात ऊसासह हजारो एकरातील इतर पिके पाण्याखाली : भूपेंद्र सिंह हुड्डा

सोनीपत : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी सांगितले की, कॅथल, हिसार, भिवानी, अंबाला, सिरसा, रोहटक, जींद, सोनीपत, कुरुक्षेत्र, करनाल आणि फतेहाबादमधील ऊस, कापूस, भात, ज्वारी आदींची हजारो एकरातील पिके पाण्यात बुडाली आहेत.

हुड्डा यांनी राज्य सरकारने शेतांमधील पाणी साठण्याच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. हुड्डा म्हणाले की, एक आठवड्याहून अधिक काळ उलटला तरी सरकारने शेतांमधून अतिरिक्त पाणी काढण्याबाबत काहीच पावले उचललेली नाहीत. आगामी काही दिवसांत आणखी जोरदार पावसाचे अनुमान आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यांची समस्या आणखी वाढू शकते. पाणी साचल्याने भात, कापूस, ऊस, ज्वारीसह पिकांच्या उत्पादनावर परिणाम होईल. सरकारने शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई दिली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here