दिल्लीत विकेंड कर्फ्यू, ओम्रीकॉनमुळे कडक निर्बंधांची घोषणा

दिल्लीत कोरोना आणि ओम्रिकॉनचे रुग्ण गतीने वाढत आहेत. गेल्या २४ तासात राजधानीत ४,००० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यादरम्यान, दिल्लीत विकेंड कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय झाला आहे. या आठवड्यापासून विकेंड कर्फ्यू असेल. दिल्लीत शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत का कर्फ्यू राहील.

दरम्यान, दिल्लीत डीडीएमएने मंगळवारी बैठक घेतली. यादरम्यान कोरोना रोखण्यासाठीच्या उपायांवर चर्चा झाली. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्णयांची माहिती दिली. सरकारी कार्यालयातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कर्मचारी ऑनलाइन अथवा वर्क फ्रॉम होम करतील. खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. दिल्लीत आधीपासूनच नाईट कर्फ्यू लागू आहे. सोमवारी कोरोनाचे ४०९९ रुग्ण आढळले. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट ६.४६ टक्क्यांवर पोहोचला.तर १५०९ रुग्ण बरे झाले. सात महिन्यानंतर दिल्लीत एकाचवेळी ४००० रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी १८ मे रोजी ४४८२ रुग्ण आढळले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here