विजयपुरा : पोलिसांनी सांगितले की, विजयपूर जिल्ह्यातील बाबलेश्वर विभागात शनिवारी रात्री नंदी सहकारी साखर कारखान्यात नव्याने बसविण्यात आलेल्या बॉयलरचा स्फोट झाला. या अपघातात चार कर्मचारी गंभीर स्वरुपात जखमी झाले अशी माहिती सुत्रांनी दिली.
कारखान्यामध्ये २२० टन क्षमतेचा बॉयलर ५० कोटी रुपये खर्च बसून बसविण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पीडित लोकांच्या नातेवाईकांनी शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापन समितीवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. बाबलेश्वर पोलीस ठाण्याच या प्रकरणाची नोंद झाली आहे.