ऊस थकबाकीच्या प्रश्‍नावरुन धरणे आंदोलन करणार्‍या आरएलएसपी नेता, स्थानिक आमदार यांनी दोन तासात संपवले उपोषण

274

बगहा(बिहार): बिहार मधील पश्‍चिम चंपारण जिल्ह्यात ऊस शेतकर्‍यांच्या थकबाकीच्या मागणीवरुन राष्ट्रीयलोक समता पार्टी (रालोसपा) चे राष्ट्रीय सचिव नंदकिशोर कुशवाहा आणि जिव्हा युवा अध्यक्ष विजय कुमार उपाध्याय मझौलिया साखर कारखाना गेटच्या समोर दोन दिवसाचे धरणे आंदोलन आणि उपोषणास बसले होते. या उपोषणाची माहिती स्थानिक आमदार मदन मोहन तिवारी यांना समजल्यानंतर त्यांनी लगेचच कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा केली. कारखाना व्यवस्थापनाने लवकरच उसाचे पैसे देण्याचे अश्‍वासन दिले. यावर आमदार मदन मोहन तिवारी आंदोलनस्थळी पोचले आणि उपोषण करणार्‍या उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजवून आंदोलन संपवले. आमदार मदन मोहन तिवारी, लोसकभेचे माजी उमेदवार बृजेश कुशवाहा, राजद प्रदेशाचे नेता आरत सिंह यांच्या बराबेर चर्चेच्या दरम्यान व्यवस्थापक सीएल शुक्ला आणि ऊस जनरल मॅनेजर जेपी त्रिपाठी यांनी अश्‍वासन दिले की, लवकरच उर्वरीत ऊसाचे पैसे दिले जातील. तात्काल 10 दिवसांचे उसाचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. या अश्‍वासना नंतर आमदारांकडून उपोषणास बसलेल्या नंदकिशोर कुशवाहा आणि विजय कुमार उपाध्याय यांना ज्यूस पाजवून उपोषण संपवण्यात आले. हे धरणे आंदोलन केवळ दोन तासच चालले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here