शॉर्टसर्किटने आग लागून गहू, ऊस जळाला

133

यमुनानगर : छप्पर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भंभौली गावातील अनेक एकर गहू आणि उसाचे पिक आगीत जळून खाक झाले. आगीची सूचना मिळतात घटनास्थळी पोलिस दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने प्रचंड प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

शेतकरी बलराम राणा, पवन राणा आणि सुंदर यांच्या शेतावरून विजेच्या तारा गेल्या आहेत. दुपारी हवा जोरात सुटल्याने विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट झाले. परिसरातील शेतकऱ्यांनी याची माहिती गावात दिली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. तोपर्यंत अनेक एकर पीक जळून खाक झाले. गव्हाच्या शेतात आग पसरत असल्यामुळे ट्रॅक्टरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत बलराम राणा यांचा अडीच एकर गहू, पवन राणा यांचा दोन एकर ऊस, अर्धा एकर गहू तसेच सुंदर यांचा अर्धा एकर गहू जळून खाक झाला.

विभागातील भंभौली, कान्हडी खुर्दमधील शेतातील गव्हाचे पीक शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जळाले. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या परिसरात शेतकऱ्यांना मदतीसाठी अग्निशमन बंब उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here