गहू आणि ऊस पिक आगीत जळून खाक

109

मेरठ : नंगलापातू येथील शेतकरी खेमचंद शर्मा यांची बारा एकर जमीन खंदावली येथील माजी सरपंच महेंद्र त्यागी यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहे. या शेतात त्यांनी गव्हाची शेती केली होती. शेतावरून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीतून उडालेल्या ठिणगीमुळे शेतात आग लागून बारा एकरातील पिक भस्मसात झाले. या आगीची माहिती मिळताच पोलिस आणि विज विभागाच्या टीमने पाहणी केली. महेंद्र त्यागी यांनी विज विभागाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देऊन नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. याशिवाय ऊर्जा विभागाविरोधात कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, दबथुवा गावातील जंगलात गुरुवारी दुपारी शेतात उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटून लागलेल्या आगीत अनेक एकरातील पिक जळाले. येथील शेतकऱ्यांनी याबाबत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दबथुवा येथील शेतकरी बिजेंदर यांच्या शेजाजवळ ट्रान्स्फार्मर आहे. गुरुवारी दुपारी एचटी लाइनवरील तार तुटून खाली पडली. यामध्ये त्यांच्या दोन एकर शेतातील गव्हाचे पिक जळून खाक झाले. याशिवाय लाल बहादूर यांचा दीड एकरातील ऊस जळाला. आगीची माहिती समजताच ग्रामस्थांनी तातडीने येऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत पिक भस्मसात झाले. बटजेवरा विज केंद्राला याची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी याबाबत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here