सर्व बाजारपेठांत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गेल्या १२ वर्षातील उच्चांकी गव्हाची आवक

ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत, देशातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (एपीएमसी) भारतातील गव्हाची गेल्या १२ वर्षातील उच्चांकी आवक झाली आहे. बिजनेस लाइनमध्ये प्रकाशित अहवालानुसार गेल्या वर्षी समान कालावधीत १.४४ मेट्रिक टन आवक झाली होती. या तुलनेत यामध्ये ५७ टक्के वाढ होवून ही आवक २.२७ मिलियन मेट्रिक टन (एमटी) झाली आहे.

अलिकडेच सरकारने देशात पुरेसा अन्नधान्य साठा असल्याचे जाहीर केले होते. आणि गहू, आटा, तांदूळ याच्या किमती नियंत्रणामध्ये असल्याचे म्हटले होते. मंत्रालयाने सांगितले की, गहू आणि तांदळाच्या घाऊक आणि किरकोळ किमतीमध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे. आट्याच्या किमती स्थिर आहेत.. सरकारने सांगितले की, किमतीमधील वाढ रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. गहू तसेच तांदूळ निर्यातीबाबत नियम लागू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here