नवी दिल्ली : खुल्या बाजारात ३० लाख टन गहू विक्री करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशनने स्वागत केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गहू आणि आट्याच्या किंमत ५ ते ६ रुपये प्रती किलो कमी होतील, असे असोसिएशनने म्हटले आहे. केंद्र सरकारने बुधवारी गहू आणि आट्याच्या दरातील वाढीची तपासणीसाठी आपल्या बफर स्टॉकमधील ३० लाख टन गहू खुल्या बाजारात विक्री केला जाईल अशी घोषणा केली.
केंद्र सरकार गव्हाचा हा साठा आगामी २ महिन्यात विविध माध्यमातून भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) द्वारे विक्री करणार आहे. हा गहू ई-लिलावाच्या माध्यमातून आटा कारखानदारांसारख्या घाऊक ग्राहकांना विक्री केला जाईल. एफसीआय गव्हाला आट्यामध्ये बदलण्यासाठी २३.५० रुपये प्रती किलो दराने गहू उपलब्ध करेल. जनतेसाठी हा गहू २९.५० रुपये प्रती किलो दराने मिळणार आहे.
न्यूज २४ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, आरएफएमएफआयचे अध्यक्ष प्रमोद कुमार यांनी सांगितले की, आम्ही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो.
दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार, बुधवारी प्रमुख शहरांमध्ये गव्हाचा सरासरी दर ३३.४३ रुपये प्रती किलो आहे. एक वर्षापूर्वी हा दर २८.२४ रुपये प्रती किलो होता.