पंजाबमधील गहू खरेदी २५ मे रोजी समाप्त होणार

अन्न, सार्वजनिक पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री लाल चंद कटारुचक्क यांनी राज्यात २५ मे पासून गहू खरेदी बंद करण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत.

कटारूचक्क यांनी सांगितले की, राज्यात एक एप्रिलपासून खरेदी सुरू करण्यात आली. चालू रब्बी हंगामात राज्यातील मंडयांमध्ये १२५.५७ लाख मेट्रिक टन (LMT) पेक्षा अधिक गव्हाची आवक झाली आहे. त्यापैकी १२१.०७ LMT गव्हाची खरेदी सरकारी एजन्सींनी केली. तर जवळपास ४.५ LMT गहू खरेदी खासगी व्यापाऱ्यांनी केली आहे. राज्यात ८,०९,१४९ शेतकऱ्यांना किमान समर्थन मूल्याच्या (MSP) रुपात २४,६९३ कोटी रुपये देण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्र्यांनी यावेळी दिली.

मंत्री म्हणाले की, राज्य सरकारने सध्याच्या रब्बी हंगामात राज्यात गहू खरेदीसाठी २,७८० मंडया सुरू केल्या होत्या. परंतु राज्यातील काही भागात १० मे पासून गव्हाची आवक खूप कमी झाली. त्यामुळे २,६२८ मंडयांना कालबद्ध पद्धतीने बंद करण्यात आले आहे. आणि आता सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण १५२ मुख्य केंद्रांच्या माध्यमातून गव्हाची खरेदी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here