उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता

नवी दिल्‍ली : उष्णतेच्या संभाव्य लाटेचा परिणाम गव्हाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. १९०१ नंतर यावर्षी देशात सर्वात उष्ण फेब्रुवारी महिन्याने मार्च-मेपर्यंत उष्णतेच्या लाटा वाढविण्याची भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे गव्हाचे दाणे पुरेसे विकसीत होणार नाहीत अशी चिंता आहे. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार गव्हाचे उत्पादन जवळपास ९८ लाख टन होईल. हे उत्पादन आधीच्या ४ टक्के पुर्वानुमानापेक्षा फक्त १.६ टक्के अधिक आहे. जर पिकाचे १० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले, तर गव्हाच्या किमतींमध्ये चढ-उतार होईल.

या आठवड्याच्या सुरुवातीला भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी सांगितले की, जर उष्णतेच्या लाटेचे पूर्वानुमान योग्य ठरले तर कृषी उत्पादनात अनिश्चितता राहील. मार्च महिन्यामध्ये उच्च तापमान आणि उष्णतेच्या लाटेच्या पुर्वानुमानामुसार गव्हाच्या पिकावर नकारात्मक परिणाम होईल. यातून गव्हाला पुरेसा विकसित होण्याचा वेळ मिळणार नाही. याचा सर्वाधिक फटका पंजाब, हरियाणा, यूपी आणि मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळेल. या राज्यांत उशीरा गव्हाची पेरणी केली जाते. आम्हाला असे वाटते की, गव्हाचे उत्पादन ९८ एमएमटीच्या दरम्यान असेल. भारताने गेल्यावर्षी अशी स्थिती अनुभवली आहे. यामध्ये सरकारने देशांतर्गत पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात निर्बंध लागू करण्यासारखी अतिरिक्त उपाययोजना केली. बफर स्टॉक ठेवण्यासह अशा उपायांनी अपुऱ्या पुरवठ्याच्या संकटाला दूर ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here