होलसेल महागाई दर सप्टेंबरमध्ये वाढून झाला 1.32 टक्के

71

नवी दिल्ली : सामान्य माणसाला महामाईपासून दिलासा मिळताना दिसत नाही. खाद्य वस्तूंच्या दरामधील तेजीमुळे होलसेल किमतींवर आधारित महागाई सप्टेंबर 2020 मध्ये वाढून 1.32 टक्के झाली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार मासिक डब्ल्युपीआई वर आधारीत महागाई चा वार्षिक दर सप्टेंबर मध्ये 1.32 टक्के राहिला, जो गेल्या वर्षाच्या समान अवधीमध्ये 0.33 टक्के होता.

होलसेल किमतींवर आधारीत महागाई ऑगस्ट मध्ये 0.16 टक्के होती. यापूर्वी डब्ल्यूपीआई वर आधारीत महागाई सातत्याने चार महिन्यांमध्ये नकारात्मक (एप्रिलमध्ये नकारात्मक 1.57 टक्के, मे मध्ये नकारात्मक 3.37 टक्के, जून मध्ये नकारात्मक 1.81 टक्के आणि जुलै मध्ये नकारात्मक 0.58 टक्के) होती.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकड्यांनुसार खाद्य वस्तुंची महागाई 8.17 टक्के राहिली. तर ऑगस्ट मध्ये ही 3.84 टक्के होती. निरीक्षणाखालील अवधीमध्ये धान्याच्या किंमतींमध्ये घट झाली, तर डाळी महाग झाल्या.

दरम्यान भाज्या महाग होण्याचे दर 36.54 टक्के उच्च स्तरावर होते . बटाट्याची किंमत एक वर्षापूर्वी च्या तुलनेत 107.63 टक्के अधिक होती, तर कांद्याच्या किंमतींमध्ये घट पहायला मिळाली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here