नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर १४.२३ टक्क्यांवर, १२ वर्षांतील उच्चांक

घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर नोव्हेंबर महिन्यात एका दशकाच्या उच्चांकी स्तरावर, १४.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे. खनिज तेल, मूळ धातू, कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसच्या किमतीत वाढ झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यापासून सलग आठव्या महिन्यात महागाईचा दर १० टक्क्यांवरच राहिला आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर १२.५४ टक्के होता. तर नोव्हेंबर २०२० मध्ये हा दर २.२९ टक्के होता.

महागाईचा दर १२ वर्षाच्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्याने आधारभूत स्थिती आणि इंधन सुचकांकामध्येही वाढ दिसून आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२१च्या महागाईचा दर मुख्यत्वे खनिज तेल, धातू, कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, रसायन उत्पादने, खाद्य उत्पादने आदींच्या किमतीत वाढ झाल्याने अधिक झाला आहे. गेल्यावर्षी या महिन्याच्या तुलनेत ही वाढ दिसून आली आहे. नोव्हेंबर महिन्यात विजेचा महागाई दर वाढून ३९.८१ टक्के झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात हा दर ३७.१८ टक्के होता. खाद्य निर्देशांक ३.०६ टक्क्यांच्या तुलनेत दुप्पट होऊन तो ६.७० टक्के झाला आहे. कच्च्या तेलाचे दरही ९१.७४ टक्के वाढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here