कृष्णाच्या कामगारांना मिळणार आता चांगली पगारवाढ

122

कराड : महापुराचा फटका बसल्याने यंदा जवळपास एक महिना उशिरा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या 30-40 वर्षात उशिरा हंगाम सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा स्थितीत ऊसतोड करणे सोपे नव्हते. पण सुयोग्य नियोजनामुळे कृष्णा कारखान्याने या आव्हानावर यशस्वीपणे मात केली. यामुळे कारखान्याच्या कामगारांना लवकरच पगारवाढ दिली जाणार असून कारखान्याचा एकही कामगार १० हजार रुपये पगाराखाली राहणार नाही, अशी घोषणा चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात आयोजित साखर पोती पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजारामबापू पाटील दूध संघाचे संचालक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते कारखान्यात गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 6 लाख 35 हजार 1 व्या साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी व्हाइस चेअरमन जगदीश जगताप, रणजीत पाटील, ऍड. बी. डी. पाटील, लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, गिरीश पाटील, पांडुरंग होनमाने, अमोल गुरव, दिलीपराव पाटील, जयवंतदादा जगताप उपस्थित होते.

चेअरमन भोसले म्हणाले, कारखान्याने ऊस तोडणीबाबतच्या अनेक तक्रारींचा निपटारा करत, सर्वांना न्याय दिला. सध्या साखरेचे भाव पडले असून, गेल्या दोन वर्षांपासून साखर उद्योगात मंदीचे वातावरण आहे. यावर उपाय म्हणून सरकारने साखर निर्यातीसाठी सहकार्य करण्यास प्रारंभ केला आहे. पण या स्थितीतून लवकर बाहेर येण्यासाठी सरकारने साखर निर्यात धोरणाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे, जेणेकरून साखरेला चांगला भाव मिळू शकेल.

संपूर्ण साखर एकदम विकली जात नसल्याने सर्वच कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे कर्ज काढूनच द्यावे लागतात. आपल्याकडे अजूनही साखर शिल्लक असल्याने यासाठी सरकारची मदत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बाळासाहेब पाटील यांनी सहकारमहर्षा जयवंत भोसले यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थामुळे कराड आणि वाळवा तालुक्यात समृध्दी आल्याचे गौरवोद्गार काढले. व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले, सुरेश भोसले यांचा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर असल्याने पगारवाढीबाबतचे आश्वासन ते प्रत्यक्षात आणतील.

यावेळी ब्रम्हानंद पाटील, मनोज पाटील, अजित थोरात, आबासो सोळवंडे, आबा गावडे, राजू मुल्ला, आण्णा काशिद, सुनिल पोळ, बबनराव शिंदे, प्रकाश पाटील, संग्राम पाटील, डॉ राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here