प्रसंगी साखर कारखाने विकून ऊस शेतकऱ्यांची देणी दिली जातील : योगी आदित्यनाथ

201

लखनऊ : चीनीमंडी

कुठल्याही शेतकऱ्यांचे शोषण केले जाणार नाही आणि जर सरकारला डिफॉल्टर कारखान्यांचा लिलाव देखील करावा लागला तरीही चालेल, पण शेतकऱ्यांची ऊस थकबाकी दिली जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. कृषी महाविद्यालयाच्या भवनाचे उद्घाटन करताना योगी आदित्यनाथ बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांची देणी बाकी ठेवून जर कुणी कमाई करत असेल तर ते योग्य नाही.

ऊस शेतकऱ्यांनी कसलीही चिंता करु नये कारण सरकार त्यांच्या मागे उभी आहे. ते म्हणाले, गरज वाटली तर आम्ही डिफाल्टर कारखान्यांचा लिलाव करु. आम्ही महाराज गंज मध्ये एका कारखान्याचा लिलाव करुन थकबाकी भागवली आहे. ज्यांनी थकबाकी भागवली नाही त्या कारखान्याविरोधात लवकरच आम्ही कडक कारवाई करणार आहोत. लखीमपूर खेरी मध्ये ९ कारखाने आहेत, ज्यातील ६ कारखान्यांनी ऊस थकबाकी भागवली आहे. आम्ही लवकरात लवकर त्या उर्वरीत ३ कारखान्यांवर कारवाई करु, ज्यांनी थकबाकी भागवली नाही.

मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना ऊस आणि ऊसाच्या पानांना आग न लावण्याबाबत आग्रह केला आहे. ते म्हणाले, आगीमुळे दिल्ली -एनसीआर सह पूर्ण राज्यात धुके आहे, जे पर्यावरण आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे. लोकांना यामुळे श्वसनाचे विकार जडत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here