कोविडमुळे निर्माण झालेल्या वाहतूकदारांच्या समस्या सोडविणार: उद्धव ठाकरे

59

मुंबई : कोविड १९ महामारीमुळे निर्माण झालेल्या वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्याबाबत त्वरीत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृहात राज्यातील ट्रक, टेम्पो, टँकर आणि बस वाहतूकदार महासंघाच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीवेळी हे आश्वासन दिले. त्यांनी राज्याच्या अर्थ, परिवहन, पोलीस अशा तिन्ही विभागांना वाहतुकदारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे निर्देश दिले.

वाहतूकदारांच्या प्रतिनिधींनी वार्षिक मोटर वाहन कर, व्यापार करात सुट देण्याची, प्रवासी तसेच शालेय प्रवासाच्या वाहनांवरील करात पूर्ण सवलत देण्याची तसेच वाहनांच्या पार्किंगच्या जागांबाबत मागण्या मांडल्या. ठाकरे यांनी सांगितले की, शहरी विकास विभागाला शहरात बस, ट्रकसाठी पुरेशी पार्किंगची सोय करण्याबाबत सूचना दिली जाईल. यासाठी स्वतंत्र योजना कार्यान्वीत केली जाईल. अधिकाऱ्यांना विविध ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्याबाबत सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड १९ मुळे आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या वाहतूकदारांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव आशीष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खरगे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी उपस्थित होते.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here