गयाना साखर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतासोबत काम करणार: उपराष्ट्रपती जगदेव यांचा विश्वास

नवी दिल्ली : गयाना सरकारने साखर उद्योगाच्या पुनरुज्जीवनावर लक्ष्य केंद्रित केले आहे. गयानात स्थानिक स्तरावर साखर उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताची तांत्रिक आणि तज्ज्ञांची मदत घेतली जाईल, असे प्रतिपादन गयानाचे उपराष्ट्रपती डॉ. भरत जगदेव यांनी केले. उप राष्ट्रपती डॉ. जगदेव यांनी अलिकडे एका पत्रकार परिषदेत सांगितले की, गयाना भारताच्या कृषी शक्तीचा लाभ घेऊ इच्छित आहे. त्यांनी सांगितले की, अलिकडच्या दौऱ्यात त्यांच्या आणि भारतातील वरिष्ठ अधिकाऱ्यांदरम्यान झालेल्या चर्चेत अनेक पर्यायांवर विचार झाला आहे.

डॉ. जगदेव यांनी पत्रकारांना सांगितले की, भारतातील ऊसाची विविधता आपल्याकडे एका एकरात मिळणाऱ्या उत्पादनाच्या तुलनेत दोन ते तीन पट अधिक उत्पादन मिळवून देईल. ते म्हणाले की, देशात टिश्यू कल्चरचा वापर केला जातो. त्यातून कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर रोपांची उगवण प्रयोगशाळेत करुन कृत्रित शेती केली जाते. गयानासाठी भारताच्या पद्धती अधिक मौल्यवान ठरतील. आमच्या साखर उद्योगासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असेल. स्थानिक कृषी उत्पादनात या तंत्राच्या एकिकृत पद्धती शिवाय, डॉ. जगदेव यांनी या गोष्टीवरही प्रकाशझोत टाकला की, भारत एका खास प्रकारच्या खतांचा वापर करतो, त्याला नॅनो खत म्हणून ओळखले जाते. यामध्ये स्थानिक स्तरावर तयार होणारा युरिया खताच्या तुलनेत कमी खर्चाचा उपयोग केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here