नवी दिल्ली : बाजारातील तेजीसोबत शुगर सेक्टरमधील शेअर्सही गुरुवारी सकाळी ११.०५ वाजता उच्च स्तरावर ट्रेड करीत होते. यामध्ये मगध शुगर्स (६.५५% अप), धामपूर शुगर मिल्स (५.९४%), अवध शुगर (५.३८%), द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज (४.९७% अप), उत्तम शुगर मिल्स (४.४३% अप), त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रिज (३.९९% अप), केसीपी शुगर अँड इंडस्ट्रीज (३.७६% अप), मवाना शुगर्स (३.७२% अप), शक्ती शुगर्स (३.६५% अप) आणि राणा शुगर्स (३.५६%) यांचा टॉप गेनर्समध्ये समावेश होता. तर सिंभावली शुगर्स (४.८९% डाउन) आणि ईआईडी पेरी (०.२१% डाऊन) या शेअर्समध्ये घसरण झाली.
एनएसई निफ्टी ५० इंडेक्स २२१.० अंकांनी वधारुन १६,९०८.६ वर ट्रेड करीत होता. तर ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स ७७५.६४ अंकांनी वधारुन ५६,४४४.६७ वर ट्रेड करीत होता.