थकबाकीदार साखर कारखान्यांचा गाळप परवाना रोखला

पुणे : महाराष्ट्रातील गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र, अनेक कारखान्यांनी ऊस बिले थकवली आहेत. त्यामुळे अशा कारखान्यांचा गाळप परवाना रोखण्यात आला आहे.

फायनान्शिअल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार महाराष्ट्रात २०२१-२२ या गळीत हंगामात ६४ साखर कारखान्यांचे गाळप परवाने अडविण्यात आले आहेत. या कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण एफआरपी दिलेली नाही. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, या कारखान्यांनी शेतकऱ्यांशी करार केला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे उसाची बिले देण्यास उशीर झाला आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांसोबत करार केल्यानंतर ते गाळप परवाना घेऊ शकतात असे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले.
साखर आयुक्त गायकवाड यांनी सांगितले की, नव्या हंगामातील एफआरपीबाबत नोव्हेंबरमध्ये चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत बहुतांश कारखाने या हंगामातील ऊस गाळपास सुरुवात करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here