महिलांनो, ऊसशेतीला पूरक व्यवसायाची जोड द्या : वैशालीताई देशमुख

लातूर : आधुनिक पद्धतीने शेती केल्यास आर्थिक उत्पन्न वाढेल, घरात आर्थिक स्थिरता येईल. यासाठी आधुनिक ऊस शेतीसोबत कृषिपूरक जोड व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे, असा सल्ला विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई विलासराव देशमुख यांनी दिला. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक महिला सभासदासाठी ‘ऊस पीक लागवड व संगोपन तंत्रज्ञान’ या विषयावर गुरुवारी महिला मेळावा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

शेतीत महिलांचे योगदान मोठे आहे. घरातील शेतीच्या कामाची जबाबदारी महिलांच्या हाती आल्यास अधिक चांगले उत्पन्न मिळेल. महिला शेती सचोटीने व काटकसरीने करतात. यामुळे महिलांनी शेतीकामाची जबाबदारी घेऊन आधुनिक ऊस शेती करावी, असे आवाहन वैशालीताई देशमुख यांनी केले. यावेळी सचिन पाटील, डॉ. सुधा घोडके यांची भाषणे झाली.

यावेळी रेणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, संत शिरोमणी मारती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, डेन्टीवन शुगर्सचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, डॉ. सारिका देशमुख, यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जे. एम. रेपाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रीती देशमुख, संशोधन अधिकारी सचिन पाटील, वरिष्ठ एस. कोटगिरे आदी उपस्थित होते. संजीव देसाई यांनी प्रास्ताविक केले. राहुल इंगळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनंत बारबोले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here