मुजफ्फरनगर : प्रगत ऊस बियाणे उत्पादन तसेच वितरण कार्यक्रमातून महिलांना रोजगाराचे चांगले साधन मिळाले आहे. या कार्यक्रमांतर्गत आठ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील १७२ गावांमध्ये कार्यरत महिला स्वयंसाह्यता गटांमध्ये कार्यरत ३६३२ महिलांनी १.२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या महिलांनी उसाचे ७७,८८,३५० रोपे तयार केली. ही रोपे २१२० शेतकऱ्यांनी आपल्या ३०० हेक्टर शेतामध्ये लावली आहेत. कोरोना काळात रोजगाराची अडचण झाली होती. अशावेळी ऊस विभागाचे उप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी महिलांसाठी तयार केलेल्या या उपक्रमातून त्यांचे जीवनमान बदलले आहे. २०२२ या दरम्यान, सुरू झालेल्या ऊस बियाणे उत्पादन, वितरण कार्यक्रमातून महिलांना मोठे बळ मिळाले.
याबाबत दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील ऊस बियाणे उत्पादन, वितरण योजनेतून महिलांना घरबसल्या रोजगार मिळाला आहे. ८ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील १७२ गावांमध्ये स्वयंसाह्यता गट कार्यरत आहेत. त्यामध्ये ३६३२ महिलांचा समावेश आहे. या महिलांनी उसाची रोपे तयार करून त्याचे वितरण केले आहे. रोपाची किंमत २.६० रुपये असते. यामध्ये सरकारकडून १.३० पैसे अनुदान मिळते. वर्ष २०२१-२२ मध्ये ७७,८८,३५० सीडलिंग तयार करण्यात आले होते.