गुयाना मध्ये साखर उद्योग पुनरुज्जीवित करण्याचे काम झाले सुरू

153

गुयाना मद्ये साखर उद्योगला पुन्हा पुनरुज्जीवित करण्याची योजना तयार करण्यात येत आहे. रोस हॉल शुगर इस्टेट मध्ये काम सुरु झाले आहे आणि संचालनाच्या पहिल्या वर्षामध्ये 8,000 ते 10,000 टन साखर उत्पादनाची शक्यता आहे, ते 38,000 टनापर्यंत घेवून जाण्याची शक्यता आहे.

रोस हॉल शुगर इस्टेट पूर्व एपीएनयू प्लस एएफसी प्रशासनाकडून बंद करण्यात आलेल्या अनेक साखर कारखान्यांपैकी पहिला असेल जो पुन्हा सुरु केला जाईल आणि 2022 मध्ये गाळप सुरु होण्याची शक्यता आहे.

2017 मध्ये एपीएनयू आणि एएफसी युती सरकारने देशभरामध्ये अनेक साखर कारखान्यांना बंद करण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे हजारो लोकांवर परिणाम झाला होता. या उचललेल्या पावलामुळे चार साखर कारखान्यांना बंद करण्यात आले आणि 7,000 साखर कर्मचार्‍यांना आपली नोकरी गमवावी लागली.

गुयाना शुगर कॉर्पोरेशनकडून डिसेंबर 2020 पर्यंत 400 कर्मचार्‍यांना पुन्हा एकदा कामावर ठेवण्याबाबत सांगण्यात आले, जेणेकरुन उद्योगांना पुन्हा पुनरुज्जीवित करण्याच्या कामी गती मिळेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here