चार लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवून कामाला लागा : सावंत

सोलापूर : भैरवनाथ शुगर कारखाना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. या हंगामात किमान चार लाख मे. टन ऊस गाळपाचे नियोजन करावे, असे आवाहन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी केले. सावंत म्हणाले की, आरोग्य मंत्री प्रा. तानाजीराव सावंत व भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली कारखाना जास्त दर देण्यासाठी वचनबद्ध आहे.

भैरवनाथ शुगरचा तेराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ अनिल सावंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय संचालक काव्यसाहेब बेंद्रे, कार्यकारी संचालक अरुण बागल, उद्योजक भरत अवताडे, शिवसेना उपशहरप्रमुख नागेश गुरव, शेतकरी संघटना अध्यक्ष अण्णा सुपनवर, आजिनाथ इरकर सुशील बागातदार, महादेव नवले व अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here