आदिनाथ साखर कारखान्यातील कामगारांचे आंदोलन

115

सोलापूर : जिल्ह्यातील करमाळा येथील श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने 41 महिन्यांचा पगार न दिल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी सांगितले. थकीत पगाराच्या मागणीसाठी कामगारांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोंलन केले.
यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना कामगार आयुक्तांशी चर्चा करुन त्यांचा पगार देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत, असेही कांबळे यांनी सांगितले.

या प्रश्‍नावर आयुक्तांनी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, कारखान्याचे अध्यक्ष व शेतकरी कामगार संघर्ष समिती व कामगार संघटनेचे पदाधिकारी यांची दोन दिवसात बैठक घेवून कामगारांचे पगार देण्यासाठी निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष नाना साखरे यांनी सांगितले.

या आंदोलनावेळी शहाजी ठोसर, आप्पा भोसले, सुनील भोंसले, महादेव मस्के, दूरदे, शहाजी शेंडे, एल.डी. कांबळे, विनायक पवार, विजय शिंदे, दत्ता चिचकर, धनंजय फडतरे, सोमनाथ क्षीरसागर, दत्तात्रय दबडे, हनुमंत पाटील, रमेश करे, शिवाजी डिकोळे, कल्पना पाटील, सारिका लोंढे, बी.बी.लालबेग, सुसाबाई धेंडे आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here