सोमेश्वर साखर कारखान्यास ७ पुरस्कार मिळण्यात कामगारांचा वाटा महत्वाचा: पुरुषोत्तम जगताप

वाघळवाडी : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राज्यात सलग तब्बल ७ पुरस्कार मिळाले. या यशात कारखान्यातील कामगारांचा वाटा मोठा आणि महत्वाचा असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. मकरसंक्रातीच्या निमित्ताने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक मंडळाकडून कामगारांना तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्हाईस चेअरमन शैलेंद्र रासकर यांनी मनोगत व्यक्त करताना सभासद व कामगारांच्या सततच्या सहकार्यामुळेच कारखाना आज प्रगतिपथावर गेल्याचे नमूद केले. त्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, प्रतापसिंह काकडे व ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप, कैलास जगताप व संदीप भोसले यांनी आपली मते मांडली.

यावेळी संचालक उत्तम धुमाळ, लक्ष्मण गोफणे, नामदेव शिंगटे, महेश काकडे, दिलीप थोपटे, किशोर भोसले, सचिन खलाटे, विशाल गायकवाड, राहुल वायाळ कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप, कारखान्याचे कामगार संचालक बाळासाहेब काकडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक निंबाळकर यांनी केले तर बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here