सहकारमहर्षी कोल्हे साखर कारखान्यात कामगारांनी घेतली सुरक्षेची शपथ

अहमदनगर : सहकारमहर्षी कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी अपघात टाळण्यासाठी उपाययोजना, रासायनिक पदार्थ हाताळताना घ्यावयाची काळजी, सुरक्षीततेचे नियम आर्दीवर मार्गदर्शन केले. सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी प्रदर्शनातील आधुनिक सुरक्षा उपकरणांची माहिती दिली. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मनेप गाडे होते. यावेळी कामगारांना सुरक्षेची शपथ देण्यात आली.

वर्षभरात कारखान्यात अपघात टाळण्यासाठी मदत करणाऱ्यांना संचालक बाळासाहेब वक्ते, आप्पासाहेब दवंगे, निवृत्ती बनकर, ज्ञानेश्वर परजणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक बाजीराव सुतार म्हणाले, माजी मंत्री स्व. कोल्हे यांनी कारखान्यात सुरक्षेला महत्व दिले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनीही कारखान्यातील प्रत्येकाच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पी. एस. अरगडे यांनी आभार मानले. कामगार नेते मनोहर शिंदे, मानव संसाधन अधिकारी प्रदीप गुरव, सहजानंदनगर शाखेचे उपाध्यक्ष गणपत दवंगे, वेणुनाथ बोळीज आदी उपस्थित होते. सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी सूत्रसंचलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here