साखर विश्व प्रतिष्ठानचा साखर कर्मचारी व शेतकरी सभासदांचा द्वितीय स्नेहमेळावा संपन्न

पुणे : साखर व्यवसायाकडे पाहिले तर खूप मोठे बलाढ्य विश्व, यामुळे ग्रामीण भागात विकासही मोठा झपाट्याने झाला आहे. हे नाकारुन चालणार नाही. या क्षेत्रामुळे राजकीय बलस्थानेही प्रबळ झाली आहेत हेही तितकेच खरे, परंतू ज्यावर या साखर कारखानदारीचा मूळ पाया आहे, तो म्हणजे यात काम करणारे साखर कामगार, कर्मचारी व शेतकरी सभासद. हे घटक मुलभूत सुविधांपासून कोसो दूर राहिलेले आहेत. जसे की राहणेसाठी हक्काचे घर, मुलांचे उच्च शैक्षणिक धोरण- सोई सवलती, प्रगती, रोजगार, व्यवसाय उपलब्धता, आरोग्य हॉस्पिटल सुविधा,मार्केटींग / बँकीग
आर्थिक सुविधा आदींचा खूप मोठा अभाव आहे. नव्हे-नव्हे तर मुळी साठ ते सत्तर वर्षात अशी व्यवस्थाच उभी राहू शकलेली नाही किंवा तसा प्रयत्नही झाल्याचे ऐकीवात नाही. याकरीता गेली दोन वर्षा पासुन ‘‘शुगर इंडस्ट्रीज ऋणानुबंध-एक परिवार’’ या सोशल मिडीयाच्या माध्यमातून या क्षेत्रातील असंख्य कार्यकारी संचालक खातेप्रमुख, इंजिनिअर, केमिस्ट व प्रत्येक विभागातील अधिकारी, कुशल कामगार यांना घेऊन राज्यस्तरीय ‘‘साखर विश्व प्रतिष्ठान’’ या व्यासपिठाच्या माध्यमातून राजकारण विरहीत सामाजिक कार्याची मुहर्तमेढ ज्ञानराज्याची भूमि नेवासा-अहमदनगर येथून उभी राहिले आहे.

पाल्यांच्या उच्च शिक्षणा साठी मेगासिटीत वस्तीगृह तथा शैक्षणिक सुविधा,या क्षेत्रातील व्यक्तिमत्वासाठी जिल्हात एक आदर्श साखर गांव निर्मिती महा कामगार साहित्य व नाट्य संमेलन,सर्वसोइनियुक्त स्वस्त दरात साखर कामगार हॉस्पिटल,सावर्जनिक व सामूहिक ग्रुप विमा,आर्थिक बैंकिग/सोसायटीज सुविधा,सर्वधर्ममिय सामुदायिक विवाह सोहळा,हतबल कामगारांसाठी निराधार केंद्र, शासकीय सोइसवली उपलब्धता,नेसर्गिक अल्प पाण्यात परवडेबल शेती आदि सकारात्मक मूलभूत सुविधा सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातुन उपलब्ध होण्याच्या दृष्ष्टिकोनातून व जनजागृती करीता साखर उद्योगातील सर्व अधिकारी,कर्मचारी, उद्योजक, शेतकरी, हितचिंतक यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता . जेष्ठ शेतकरी सभासद मोहनराव होलम पाटील बारडगाव कर्जत यांचे हस्ते दीपप्रज्वल करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुने

श्री. प्रकाश नाईकनवरे,कार्यकारी संचालक नॅशनल फेडरेशन, दिल्ली
श्री. संजय खताळ,कार्यकारी संचालक राज्य फेडरेशन, मुंबई
श्री. अजित चौगुले, कार्यकारी संचालक वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.
लाभले होते .हा संयुक्त स्नेहमेळावा २८/०७/२०१९ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० पर्यंत DSTA हॉल, शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाला आहे.
प्रसंगी प्रमुख म्हनाले साखर विश्व प्रतिष्ठान है एक सामाजिक अधिष्ठान असून आत्ता एक विचार बनत आहे.यास सर्वानी सहकार्य करावे आम्हीही सर्व शासकीय योजना राबविने कामी सहकार्य करु अशा भावना व्यक्त केल्या,प्रसंगी महाराष्ट् cet परीक्षेत राज्यत प्रथम आलेला साखर कामगार मुलगा आदित्य अभंग,उच्च शिक्षण घेवुन मंत्रालयता कक्ष अधिकारी म्हनुन रुजू झालेले अभीषेक गाढवे,सुनिल कदम जलतज्ञ सुखदेव फुलारी व पुढील प्रमाणे उत्कृष्ठ निबंध लेखक यांचे मान्यवरांचे हस्ते सन्मानपूवर्क प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात सन्मान करण्यात आला

1) श्री. एफ्.एम्.दुंगे , सेफ्टी & सुरक्षा अधिकारी, समर्थ, जालना

{२} श्री. व्ही. एस्.कोकणे, टर्बाईन फोरमन ,ज्ञानेश्वर, भेंडा,नेवासा

{३} श्री. रामकिसन मुंजाजी कदम,डे.चीफ केमिस्ट,जागृती शुगर, लातूर

{४} श्री.अभय रामचंद्र शिंदे, डे.को-जन मॅनेजर, स.म.अकलूज

{५} श्री. विकास विलास रणवरे,लॅब केमिस्ट, एनव्हायरन्मेंट,विठ्ठलराव शिंदे, माढा

{६} श्री. तात्याराव वामनराव पाटील, ज्युस सुपरवायझर, हुतात्मा किसन अहिर,वाळवा

7)दिलीप वारे ,सेंट्री. फोरमैन ,भीमाशंकर ससाका पुणे

” खास बाब – अनुभव ”
{१} श्री. एम्.पी.भोरकडे,चीफ इंजिनिअर, जय श्रीराम, जामखेड

{२} श्री. प्रेमसुख रामविलास सोमाणी,माजी जनरल मॅनेजर, राहुरी कारखाना.

3) हेमंत दरंदले चिफ अंकोट ,मुळा ससाका सोनई अहमदनगर

संस्थेचे विश्वस्त
चारुदत्त देशपांडे (प्रेसिडेंट जयवंत शुगर सातारा) दत्ताराम रासकर(मुख्याधिकारी श्रीनाथ म्हस्कोबा शुगर पुणे) अनिल शेवाळे(कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर ससाका अहमदनगर)अविनाश कुटे पाटील(ऑटो-कँड इंजिनिअर अंबालिका शुगर अहमदनगर) महेश जोशी(सरव्यवस्थापक संताजी घोरपड़े शुगर कोल्हापुर सुनीलकुमार देशमुख(जागृती शुगर लातुर) समीर सलगर (कार्यकारी संचालक गोकुळ शक्ति शुगर सोलापुर दासराव कातोरे (टोकाई ससाका हिंगोली) यांचेसह या क्षेत्रातील जेष्ठ श्रेष्ठ कार्यकारी संचालक सर्व खातेप्रमुख,इंजीनिअर,केमिस्ट सर्व कर्मचारी व कामगार बांधव प्रयत्नशील आहेत.असे संस्थेचे सचिव/संस्थापक अविनाश कुटे पाटील यांनी आमचे प्रतिधिनी कड़े सांगितले आहे.

कार्यक्रमास महाराष्टiच्या कानाकोप-या जवळपास सर्व साखर कारखान्याचे प्रतिनिधिक स्वरुपात ऐकून 265 प्रतिनिधि हजर होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंबरीश कदम,सुहास शिंनगारे,किरण बुनगे,विकास म्हेत्रे,रोशन तावरे,ज्ञानेश्वर थोरात,सचिन भोसले,विश्वनाथ बहीर,जयदीप गाढे, गणेश येवले,हेमंत पाढरपट्टे,राजेंन्द्र भवर,व्ही.डी. गायकवाड, कुंभार,अदिनी परिश्रम घेतले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here