जागतिक साखर उत्पादन ३.८ मिलियन टनाने कमी होण्याचे अनुमान

228

लंडन : इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनने नुकतेच २०२१-२२ या हंगामातील साखर उत्पादनाचे आपले अनुमान जाहीर केले आहे. जागतिक स्तरावर साखरेचे उत्पादन ३.८ मिलियन टनाने कमी होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
एक मे रोजी इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनने २०२१-२२ मध्ये आपले पूर्वानुमान जाहीर करत २.६ मिलियन टन साखर उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तविला होता. तर गेल्या आठवड्यात रॉयटर्सच्या सर्व्हेतून २.० मिलिटन टन उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली होती. हे नवे अनुमान त्यापेक्षा खूप अधिक आहे.

त्रैमासिक बाजाराच्या दृष्टिकोनातून सरकार नियमांनुसार ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या हंगामात उत्पादनात ०.२ टक्क्यांची म्हणजेच १७०.६ मिलियन टनाची किरकोळ वाढ दिसून आली होती. तर साखरेचा खप १.६ टक्क्यांनी वाढून १७४.५ मिलियन टन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here