जगातील पहिल्या CNG बाईकच पुण्यात झाले अनावरण

पुणे : जगातील पहिली सीएनजी बाईक आज पुण्यात लाँच करण्यात आली. बजाज कंपनीने सीएनजी बाइक्स बनवल्या आहेत. या बाईकमध्ये 125 सीसीचे इंजिन आहे, अशी अपेक्षा राजीव बजाज यांनी व्यक्त केली आहे.ही जगातील पहिली CNG बाईक असल्याचा कंपनीचा दावा आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, भारत हा ऑटोमोबाईल उद्योगात सातव्या क्रमांकावर होता, आता तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, ते म्हणाले कि, या बाईकच्या निर्मितीबद्दल मी बजाज कंपनीचे अभिनंदन करतो.बजाजने आणलेली ही बाईक तीन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये उपलब्ध असेल. या मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 95 हजार रुपये, 1 लाख 5 हजार रुपये आणि 1 लाख 10 हजार रुपये इतकी असेल. लवकरच या बाइक्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

सीएनजी बाइकची खासियत काय आहे?

ही बाईक 125 सीसी इंजिन क्षमतेची बाईक आहे.या बाइकमध्ये 2 किलोची सीएनजी टाकी आहे. सीटखाली सीएनजी टाकी बसवली आहे.पेट्रोल टाकीच्या वरती सीएनजी टाकीसाठी जागा देण्यात आली आहे.या बाईकमध्ये दोन लिटरची पेट्रोल टाकीही असेल.या बाइकची सरासरी रेंज 230 किमी आहे. बजाज फ्रीडम असे या बाइकचे नाव आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here